28.3 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeमहाराष्ट्रसंपकाळात वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील

संपकाळात वीज पुरवठ्यासाठी महावितरण प्रयत्नशील

एकमत ऑनलाईन

अकोला : समांतर वीज वितरण परवान्याला विरोध दर्शवित महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृति समितीव्दारे राज्यव्यापी संपाची घोषणा केली आहे. या संपात अकोला परिमंडळातील कर्मचा-यांचाही सहभाग आहे.

त्यामुळे दिनांक ३ जानेवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या ७२ तासांच्या संप काळात सुरळीत वीज पुरवठ्याची खबरदारी घेतली असली तरी,या काळात ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन अकोला परिमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

वीज कर्मचा-यांच्या संपात महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील एकूण २९ संघटनांचे कर्मचारी, अभियंते व अधिकारी सहभागी आहेत.

अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी बा स्रोत कर्मचा-यांच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व माहिती देण्यासाठी विभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने महावितरणकडून सर्व काळजी घेण्यात येत आहे, तथापि या कालावधीत वीजपुरवठा खंडित झाल्यास पूर्ववत होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी संयम पाळून सहकार्य करावे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या