31.9 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्र“महाजॉब्स” संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

“महाजॉब्स” संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा

एकमत ऑनलाईन

“महाजॉब्स” या संकेतस्थळावर बेरोजगारांचा लोंढा…..

मुंबई : राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. ठाकरे यांनी लोकार्पण केलेले “महाजॉब्स” हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे नमूद केले तसेच काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार किंवा नोकरी उपलब्ध करून दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करताच, “महाजॉब्स” या संकेतस्थळावर अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली. एका बाजूला तरूणांना काम नाही आणि दुसऱ्या बाजूला उद्योजकांना मनुष्यबळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा हजारो तरूणांना आणि उद्योजकांना होणार आहे.

कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत. राज्यातील उद्योग सुरू व्हावेत यासाठी परवानग्या देण्यात आल्या असून हजारो उद्योग सुरू झाले आहे. राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

९०,००० भूमिपुत्रांनी या पोर्टलवर नावनोंदणी

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते महाजॉब्स पोर्टलचे उद्घाटन झाल्यानंतर काल दिवसभरात सुमारे ९०,००० भूमिपुत्रांनी या पोर्टलवर नावनोंदणी केली आहे.

Read More  चार टक्के रुग्णांसाठी 96 टक्के लोकांना वेठीस धरणे चुकीचं -गिरीश बापट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या