35 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्र१० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; गोलमेज परिषदेत निर्णय

१० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद; गोलमेज परिषदेत निर्णय

एकमत ऑनलाईन

आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच

कोल्हापूर :सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव नाराज झाले आहेत. मराठा समाजार्फे राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. दुसरीकडे, आज (बुधवारी) कोल्हापूर शहरात राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गोलमेज परिषदेत एकूण १५ ठराव सर्व सहमतीने मांडण्यात आले. त्यावर चर्चा सुरू आहे. गोलमेज परिषदेला राज्यभरातील मराठा समाजाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी येत्या १० ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा नेत्यांनी केली आहे. आज झालेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. आमच्या मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेण्यात येईल, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आले. कोल्हापुरात आज गोलमेज परिषद पार पडली. यावेळी १५ ठराव मंजूर करण्यात आले. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गोलमेज परिषदेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी बंदची हाक दिली.

आमच्या ठरावाची प्रत राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही पाठविण्यात येणार आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही बंद मागे घेऊ अन्यथा १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

तर थोबाड फोडो आंदोलन
‘आम्ही बंदची हाक दिली आहे. त्याआधीच सरकारने या ठरावांची अमलबजावणी करावी. नाही तर १० तारखेनंतर आम्ही थोबाड फोडो आंदोलन करू,’ असा इशारा विजयंिसह महाडिक यांनी दिला.

धनगर समाजाची गोलमेज परिषद
मराठा समाजाच्या आजच्या गोलमेज परिषदेनंतर येत्या २ ऑक्टोबर रोजी कोल्हापूरमध्ये धनगर समाजानेही गोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे.मराठा समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूरात महाराष्ट्रातील ४८ खासदार व मराठा समाजातील १८१आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

‘नोकरभरतीला सरकार कधी स्टे देणार आहे?
पुढच्या काळात ’ एक मराठा, लाख मराठा’ म्हणत राज्यभर आंदोलन चालू राहील. राज्य सरकारने वेगवेगळ्या विभागात १२६० कोटी रुपये देऊ, अशी घोषणा केली आहे. राज्य सरकारने १२०६ कोटी रुपये कसे आणि कधी देणार आहेत, याचा खुलासा करावा. ‘नोकरभरतीला सरकार कधी स्टे देणार आहे? मराठा समाजाच्या मुलांची २०२०-२१ सालाची फी परतावा सरकार कशी देणार आहे? त्याचबरोबर शिवस्मारकाचं काम कधी सुरु करणार? या गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी किंवा राज्य सरकारने मीटिंग न बोलवता करावा. स्वत: ९ ऑक्टोबरपर्यंत या सगळ्या घोषणांची पूर्तता कशी करणार हे त्यांनी मुंबईत बसून स्पष्ट करावे. त्यातून आमच्या मनाला समाधान वाटलं तर महाराष्ट्र बंदची घोषणा मागे घेऊ. पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल,’ असा इशाराही यावेळी देण्यात आला.

मराठा समाजात असंतोष
मराठा आरक्षण मिळविण्यासाठी गेल्या २५ वर्षापासून प्रयत्न चालू आहेत. अनेक आंदोलने, ५८ मूक मोर्चे आणि ५० मराठा बांधवांचे बलिदान इतक्या मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण आरक्षणाच्या विरोधात काही लोकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याने आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजातील मुला-मुलींच्या नोकरी व शिक्षणाचे मार्ग बंद झाले आहेत.

गोलमेज परिषदेतील १५ ठराव

 • केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.
 • मराठा समाजाच्या मुलामुलींना शासनाकडून चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा मिळावा.
 • मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच.
 • महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणा-या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.
 • सारथी संस्थेसाठी १००० कोटींची आर्थिक तरतूद करावी.
 • अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १००० कोटींची तरतूद करावी.
 • राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.
 • मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत.
 • मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.
 • राज्यातील शेतक-यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
 • स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी.
 • अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.
 • राज्यातील शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करावी.
 • कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.
 • राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी.

धक्कादायक : हुंड्यासाठी मुलीच्या डोळ्यात काढला दोष ; पित्याने केली नेत्रज्ज्ञांकडून डोळ्याची तपासणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या