मुंबई : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय तसंच उद्योग धंद्यांवर परिणाम झाल्याचं दिसून आलंय. यासाठी अनेक संघटनांना त्यांच्या मागण्यांसाठी थेट कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर संदीप देशपांडेंनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवासस्थान “कृष्णकुंज” हे सर्वसामान्य जनतेसाठी समस्या मांडण्याचं एक ठिकाण बनलं आहे. राज दरबारी मांडलेली समस्या तात्काळ निकाली लागत असल्याचं चित्रही समोर येत आहे असा टोला मनसे नेते संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 16, 2020
संदीप देशपांडे यांनी महाविकासआघाडी सरकारला उपरोधिक टोला लगावताना म्हटले आहे की, ‘समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता ‘श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28.’ दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्याकडे आलेल्या लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सत्तेतील मंत्र्यांपासून, मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांशी पत्रव्यवहार आणि संपर्क साधला आहे. त्यापैकी अनेक विषयांची राज्य सरकारकडून दखल घेतली गेली आहे. राज ठाकरेंनी देखील यावरून मिश्किल टोला लगावत ‘मतं त्यांना द्या आणि समस्या घेऊन माझ्याकडे या’ असे म्हटले होते.
कोळी बांधव, वारकरी अन् ब्रास ब्रॅन्ड पथक विविध समस्या घेऊन ‘कृष्णकुंज’च्या राज दरबारी
राज ठाकरेंनी ही समस्या सरकारकडे मांडावी यासाठी मनसेने पुढाकार घ्यावा असं राज ठाकरेंना विनंती करण्यात आली होती. तेव्हा एकादशी निमित्त वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? त्यासाठी काय उपाययोजना करायल्या हव्या असं राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला विचारलं होतं. मुंबईतल्या कोळी बांधवांनी गावठणाची जमीन मालकीवर दिली जात नाही अशी तक्रार घेऊन राज ठाकरेंना भेट घेतली आहे.
सात-आठ महिन्यापासून लग्न व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे, मोठमोठे उत्सव, लग्न समारंभ बंद असल्याने ब्रास ब्रँन्ड व्यवसायिक अडचणीत आले आहेत, सगळीकडे अनलॉक करत असताना आमच्यावर बंदी का असं सवाल ब्रास बँन्ड पथकाने विचारला आहे, राज ठाकरेंकडे आमच्या समस्या मांडल्याने त्या सुटतील असा विश्वास या लोकांनी व्यक्त केला आहे.
स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे भक्तांची मोठी गर्दी