28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeमहाराष्ट्र२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल

२ कोटी लसीकरण करणारा महाराष्ट्र देशात अव्वल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मागील महिन्यात कोरोना महामारीने महाराष्ट्रात थैमान घातले होते. महाराष्ट्राची रूग्णसंख्या ही देशात सर्वात जास्त होती. महाराष्ट्रात दररोज ६० हजारांच्यावर रूग्ण सापडत होते. त्यानंतर राज्य सरकारने लसीकरणावर भर देण्याचा प्रयत्न केला. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जनतेला लसीकरण करण्याचे आवाहन केले होते़ त्यानंतर आता महाराष्ट्रात २ कोटी लसीकरणाचा टप्पा पुर्ण केला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली़

लसीकरणाचा २ कोटी विक्रमी टप्पा गाठणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. ही देशातली अव्वल कामगिरी असून, या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र अव्वल आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आरोग्य यंत्रणेची पाठ थोपटली आहे.

राज्यात लसीची कमतरता
राज्यात कोविशील्ड लसीच्या प्रतीक्षेत १६ लाख जण आहेत. कोवॅक्सिन लसीचे केवळ ३५ हजार डोसच उपलब्ध आहेत. राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिन लसीचे पावणे तीन लाख डोस उपलब्ध आहेत. तर केंद्राने दिलेले ३५ हजार डोस आहेत. हे सर्व डोस ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरले जाणार असल्याने राज्यात काही काळ १८ ते ४५ वयोगटाच्या लोकांचे लसीकरण थांबवण्यात आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले होते़

डायरेक्ट ‘लग्गा’ लावा.. अन् कोविड लस घ्या!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या