28.2 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home महाराष्ट्र महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही ! - उद्धव ठाकरेंचा इशारा

महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही ! – उद्धव ठाकरेंचा इशारा

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि. १ (प्रतिनिधी) उत्तरप्रदेशमध्ये जे घडले ते दुर्देवी आहे. मात्र, महाराष्ट्रात अशा घटना सहन केल्या जाणार नाही. महिलांवर अत्याचार तर सोडाच त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमतसुद्धा होता कामा नये, अशा इशारा देतानाच गुंडाची दहशत मोडून काढण्यासाठी पोलीसांचा दरारा राहिला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा डिजिटल उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील हातरस येथे दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल सहवेदना व्यक्त केल्या. उत्तर प्रदेशातील ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. महिलांवर अत्याचार सहन केले जाऊ नयेत. केवळ मिरा-भाईंदर नाही तर महाराष्ट्रामध्ये माझ्या माता-भगिनींकडे अत्याचार करण्याची सोडाच पण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, अशा पद्धतीचा कारभार केला पाहिजे.

अशा घटना महाराष्ट्रात होऊ नये यासाठी पोलिसांचा वचक पाहिजे. सर्वसामान्य जनतेला पोलिसांची आदरयुक्त भीती आणि गुन्हेगारांना दहशत वाटली पाहिजे. दरारा आणि दहशतीबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब सांगायचे कि, पोलिसांचा असतो तो दरारा आणि गुडांची असते ती दहशत. दशहत आणि गुडांगर्दी चालू असेल तर पोलिसांनी ती मोडूून काढली पाहिजे. त्यासाठी पोलीसांचा दरारा पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

स्थानिक जनतेच्या मनात पोलिसांविषयी मित्रत्वाची भावना निर्माण करतांनाच वाईट कृत्य केल्यास पोलिसांचे आपल्यावर लक्ष आहे ही भीती प्रत्येकाला वाटली पाहिजे. जनतेचे रक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. गुंडागर्दीला आळा घालण्याबरोबरच महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या ऑनलाईन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, शंभुराजे देसाई, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, मीरा भाईंदर ,वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांसह ठाणे पालघर जिल्ह्यातील खासदार, आमदार , लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

हाथरस अत्याचार प्रकरणी जनवादी संघटना आक्रमक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या