24.9 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडीही वात पेटवणार

महाविकास आघाडीही वात पेटवणार

एकमत ऑनलाईन

मुंबई: भाजप नेत्यांनी आघाडी सरकारमधील मंर्त्यांचे घोटाळे काढण्यास सुरुवात केल्याने आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता आघाडी सरकारनेही भाजप विरोधात वात पेटवण्याचा निर्णय घेतला आहे. तसा इशाराच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फायली काढणार आहोत, असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. महाविकास आघाडी एकत्र येऊन फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार आहे. तशी वेळच आता आली आहे, असं पटोले म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या रस्ते घोटाळ्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पाटील यांनी स्वत: खाल्ले. पण दिसून आले नाही. किती खाल्ले ते त्यांनी सांगून जावे, असंही ते म्हणाले.

केंद्र सरकारवर जनतेची नाराजी
भाजप लोकांची दिशाभूल करत आहेत. लोकांचं प्रश्न सोडवत नाही. केंद्र सरकारवर जनतेची नाराजी आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची नौटंकी सुरू आहे. म्हणूनच किरीट सोमय्या स्टंट करत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी गंमत केली
मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात विरोधकांना भावी सहकारी म्हटले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्या गोष्टीची गंमत करणे, जोक करणं हा मुख्यमंत्र्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे त्यांनी गंमतीत ते विधान केले असावे, असे ते म्हणाले. किरीट सोमय्यांनी भाजप नेत्यांचेही भ्रष्टाचार उघड करावेत. त्यांना महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद मिळतील. असा चिमटाही त्यांनी काढला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या