21.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home महाराष्ट्र टीआरपी घोटाळा प्रकरणी महामुव्हीवर मोठी कारवाई

टीआरपी घोटाळा प्रकरणी महामुव्हीवर मोठी कारवाई

एकमत ऑनलाईन

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणातील आरोपी महामुव्ही या वाहिनीवरही मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने वाहिनीचा सर्व्हर आणि कंटेंट सील केला आहे. त्यामुळे आता या वाहिनीला प्रसारण करता येणार नाही. दरम्यान या प्रकरणी दर्शनसिंह आणि विश्वजित शर्मा यांना अद्याप अटक केलेली नाही.

टीव्ही चॅनल्सकडून आपल्या चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी होत असलेल्या घोटाळयाचा मुंबई पोलिसांकडून पदार्फाश झाला होता. जुहू पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या कॉपीराईट प्रकरणात महामुव्ही विरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर गुन्हे शाखेने ‘महामुव्ही’ वाहिनीच्या प्रवर्तक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय वर्मा यांना अटक केली होती. यानंतर आता महामुव्ही वाहिनीचा सर्व्हर आणि कंटेंट सील केला आहे. त्याशिवाय महामुव्ही चॅनलचा आर्थिक लेखापरीक्षण अहवाल तपासला जाणार आहे. दर्शनसिंह यांच्यावर एलओसीही (लुक आऊट नोटीस) जारी केली आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.

गळा कापून टाकेन, पण भाजपसमोर झुकणार नाही – ममता बॅनर्जी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या