मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्रीने फेमिना मिस इंडिया फिनेले २०२२ ला उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमामध्ये मलायकाच्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कार्यक्रमासाठी मालायकाने ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. पण मलायकाला ट्रानस्परंट ड्रेस घालणं चांगलंच महागात पडलं आहे.
मिस इंडिया इव्हेंटसाठी मलायकानं गोल्डन रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. त्याचबरोबर गळ्यात नेकपिस देखील घातला होता. मलायकाचा हा हटके लूक पाहून चाहते तिच्याकडे पाहतचं राहिले. यावेळचा मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या लुकमुळे मलायकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.