26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्रमलिक, देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

मलिक, देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाविकास आघाडीतील बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमूख राज्यसभा निवडणुच्या मतदानापासून वंचित राहीले. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीलाही मोठा फटका बसला आहे.

मलिक आणि देशमुख यांच्या मतदान सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असून त्यावर काही वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे. मतदान करण्यासाठी मुभा द्यावी अशी मागणी मलिक, देशमुखांच्या वकीलांतर्फे न्यायालयात करण्यात आली आहे. न्यायालयात बाजू मांडताना मलिक आणि देशमुख यांचे वकीलांनी आमच्या अशिलांना विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करु द्यावे अशी विनंती न्यायालयाकडे केली.

तुरुंगातून मदतानस्थळी जाण्यासाठी वीस मिनिटे लागतात त्यामुळे आता परवानगी दिल्यास नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानस्थळी जाता येईल आणि मतदान करता येईल. त्यामुळे त्यांना मतदानासाठी परवानगी द्यावी अशीही त्यांनी न्यायालयाकडे विनंती केली आहे. मलिक, देशमुखांच्या वकीलांचे म्हणणे आहे की, दोन्ही लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडून आले आहेत त्यामुळे त्यांना मतदानाची अनुमती द्यावी अशी मागणीही त्यांची आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या