25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रदेशमुख आणि नवाब मलिक यांची सुधारित याचिकाही फेटाळली

देशमुख आणि नवाब मलिक यांची सुधारित याचिकाही फेटाळली

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. मतदानाची परवानगी देण्याची मागणी तुरुंगात असणा-या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला. सत्र न्यायालयाने याला नकार दिल्यानंतर देशमुख आणि मलिकांनी वरील न्यायालयात धाव घेतली. मात्र विशेष न्यायालयानेही त्यांना दणका दिला. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मते कमी होणार हे स्पष्ट होते. यानंतर दोन्ही मंत्र्यांच्या वकिलांनी पुन्हा याचिका दाखल केली. ईडीकडून अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला.

अनिल देसाई यांनी मलिक यांची बाजू मांडली. यासाठी त्यांनी तात्पुरत्या जामिनाची मागणी केली आहे. मात्र अटक असताना जामीन कोणत्या आधारावर द्यायचा, असा प्रश्न कोर्टाने विचारला. यावर प्रत्युत्तर देताना पोलिस बंदोबस्तात मतदान करू देण्याची मागणी करण्यात आली. मात्र आता मलिकांना सुधारित याचिकेबाबतही फटका बसला आहे. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मलिक यानी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

मुंबई सत्र न्यायालयाने मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी परवानगी मिळण्याची याचिका फेटाळली होती. अमित देसाई हे मलिक यांना तात्पुरता जामीन किंवा पोलिस बंदोबस्तात मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी परवानगी मागत होते. मात्र, न्यायालयाने नकार दिला. तसेच सुधारित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. अद्याप कोर्टाने यावर सुनावणी घेतलेली नाही. चार वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याने मलिक यांचे मतदान होणे आता अशक्य झाले आहे.

न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी यापूर्वीच अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास
नकार दिला आहे. त्यामुळे सध्या सुनावणी फक्त नवाब मलिक यांच्या बाबतीत सुरू होती. अखेर त्यांना न्यायालयाने दणका दिला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या