21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रमंगलप्रभात लोढा ‘शिवतीर्थवर राज ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट

मंगलप्रभात लोढा ‘शिवतीर्थवर राज ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकारचा ९ ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळ विस्तार झाला. मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये मुंबई भाजपाचे अध्यक्ष तथा विकासक मंगलप्रभात लोढा यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, मंत्रीपद मिळताच लोढा यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बुधवारी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती मिळू शकली नाही.

नवनियुक्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज १० ऑगस्ट रोजी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मनसेने भाजपा-शिंदे सरकारला पाठिंबा दिलेला आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी शिंदे सरकारच्या बाजूने मत दिले होते. त्यानंतर भाजपाच्या कोट्यातील एक मंत्रिपद मनसेला दिले जाणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, असे असताना मंगल प्रभात लोढा यांनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या