26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeमहाराष्ट्रमंगेश डोंग्रजकर यांना ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार

मंगेश डोंग्रजकर यांना ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ मुंबईच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार-२०२२ एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांना जाहीर झाला आहे. यासोबतच एकमतच्या नांदेड आवृत्तीचे निवासी संपादक चारुदत्त चौधरी यांनाही पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर झाला असून, दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पत्रकारितेसह विविध क्षेत्रात असामान्य योगदानातून समाज जीवन संपन्न करणा-या विविध मान्यवरांना दरवर्षी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ मुंबईच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार एकमतचे संपादक मंगेश देशपांडे-डोंग्रजकर यांना, तर सिरळी (ता. कळमनुरी) येथील महाराष्ट्र आदिवासी आश्रमशाळेचे संचालक भगवानराव देशमुख यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. यासोबतच नांदेड येथील दै. नांदेडवार्ताचे संपादक प्रदीप नागापूरकर यांना यशवंत पाध्य स्मृती पुरस्कार, एकमतच्या नांदेड आवृत्तीचे निवासी संपादक चारुदत्त चौधरी आणि साप्ताहिक कळमनुरी समाचारचे संपादक ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर तोष्णिवाल यांना पत्रकार भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा साहित्य रत्न पुरस्कार नांदेड येथील कवी, लेखक, साहित्यिक व्यंकटेश काटकर यांना, वसमत येथील हभप शरद महाराज अंबेकर यांना समाजभूषण, जळगावचे सहायक पोलिस निरीक्षक (रेल्वे) भाऊसाहेब शशिकांत मगरे यांना आदर्श प्रशासक पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ मुंबईचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या