24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रअनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात

अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असणा-या भाजपामधील चर्चा अपयशी ठरल्यानंतर राज्यसभेची निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे.

अपक्ष आमदारांनी आपल्यालाच मतदान करावे, यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. असे एकंदरित राजकीय वातावरण असताना अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी मोठे विधान केले आहे. अनेक अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अपक्ष आमदारांनी सर्व पत्ते पिसून ठेवले असून ते फक्त टाकणं बाकी आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. रवी राणा यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

त्यांनी म्हटले की, ‘‘राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष आमदारांनी पत्ते पिसून ठेवले आहेत. १० तारखेला हे पत्ते केवळ टाकायचे आहेत. अपक्ष आमदारांनी मिळून अपक्ष खासदार संजय काकडे यांना निवडून दिले होते. संजय काकडे यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी अपक्ष आमदारांनी मोठी ताकद लावली होती, त्यामध्ये मीही होतो.

त्यामुळे यावेळी देखील अपक्ष आमदारांनी पत्ते पिसून ठेवले आहेत. १० तारखेला ते फक्त टाकायचे आहेत. अनेक अपक्ष आमदार माझ्या संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या