Tuesday, October 3, 2023

तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय

मुंबई : लडाख सीमेवरील भारत-चीन यांच्यात सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी tiktok या लोकप्रिय चिनी अ‍ॅपसह एकूण ५९ अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी अ‍ॅपवर बहिष्कार टाकल्याचा प्रचार होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘तिथं मॅप बदललेत आपण अ‍ॅपवर बंदी घालतोय; काय पोरकटपणा आहे,’ अशा बोचऱ्या शब्दात आव्हाड यांनी सरकावर टीका केली.

आव्हाड यांनी यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं कि, ‘तिथे मॅप बदलले जात आहेत आणि आपण इथे अ‍ॅपवर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी)-२ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का? कशाला ही धूळफेक?,’ असा सवाल आव्हाड यांनी केंद्र सरकारला केला आहे.

Read More  शेखर कपूर यांना नोटीस : सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणखी गुंतत चाललं आहे

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या