23.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home महाराष्ट्र मुंबईच्या वेशीवर मराठा आंदोलक

मुंबईच्या वेशीवर मराठा आंदोलक

तगडा पोलीस बंदोबस्त ; आरक्षण न दिल्यास मुंबईची नाकेबंदी करण्याचा इशारा

एकमत ऑनलाईन

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुन्हा आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर धडकले. आरक्षणाचा प्रश्न न सोडविल्यास दिल्लीतील शेतकरी आंदोलनाप्रमाणे मुंबईची नाकेबंदी करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान राज्य सरकारकडून आंदोलक मुंबईत शिरु नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मराठा आंदोलनामुळे मुंबईच्या वेशीवर नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबई बाहेरच्या जिल्ह्यातून किंवा शहरांतून आंदोलक मुंबईत येऊ नयेत म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तसेच मुंबईच्या वेशींवरही पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून पोलिसांकडून वाहनांची तपासणीही केली जात आहे.

बंदोबस्तानंतरही आंदोलकांकडून गनिमी कावा
मुंबईबाहेरून मराठा समाजाचे आंदोलक मुंबईत येऊ नयेत म्हणून पोलिसांनी वाशी आणि मानखुर्द दरम्यान नाकाबंदी केलेली आहे. संशयित गाड्यांची पोलिस तपासणी करत आहेत. तसेच मुलूंड टोलनाक्यावरही पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. मात्र तरीही कोल्हापुरातील मराठा समाजाचे काही आंदोलक मुंबईच्या वेशीवर पोहचले. तर काही आंदोलक गनिमी कावा करून मुंबईत रात्रीच पोहचले आहेत.

पोलिसांकडून गाड्यांची कडेकोट तपासणी
मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नसल्याने मराठा आंदोलकांनी आता मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पोहोचू लागले आहेत. आंदोलनकर्त्यांना मुंबईच्या प्रवेशद्वारावर अडवण्यासाठी मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. कळंबोली, वाशी, मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर पोलीस बंदोबस्त लावला असून कार्यकर्त्यांच्या गाड्या तपासल्या जात आहेत. ज्या गाड्यांमध्ये मराठा आंदोलक भेटतील त्यांना ताब्यात घेवून परत गावाकडे पाठवले जात आहे.

त्या अधिका-यास पाठविण्यास बॅनर्जींचा नकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या