22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण : छगन भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

मराठा आरक्षण : छगन भुजबळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

एकमत ऑनलाईन

नाशिक : ओबीसींचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक भुजबळ फार्म येथील निवासस्थाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भुजबळ हे जिल्हा दौऱ्यावर असून त्र्यंबकेश्वर येथे विविध कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतिरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्यामुळे ओबीसींचे नेते असलेले भुजबळ हे समाजाबरोबर आहे किंवा नाही याचा जाब विचारण्यासाठी आंदोलन असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आज सकाळी दहा वाजेपासून हे आंदोलन सुरू आहे. मात्र, भुजबळ उपस्थित नाहीत.

मराठा समाजाच्या आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक शासकीय नोकर भरती होत असल्याचा मुद्दा आंदोलकांचा आरोप आहे. त्यामुळे ही भरती रद्द करावी तसेच मराठा आरक्षण शिवाय अशाप्रकारे भरती करू नये शैक्षणिक कारणासाठी मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यात यावा अशा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत यासंदर्भात राज्य सरकारने वटहुकूम काढण्यासाठी तातडीने विधिमंडळाचे अधिवेशन बोलवावे त्यासाठी सर्व आमदार-खासदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून विशेष अधिवेशनाची मागणी करावी यासाठी समाजाच्या वतीने भुजबळ यांना निवेदन देण्यात येणार आहेत भुजबळ वेळेत न आल्यास त्यांच्या निवासस्थानाला निवेदन चिटकून कार्यकर्ते परतणार आहेत दरम्यान या आंदोलनामुळे भुजबळ यांच्या नाशिक येथील निवासस्थानासमोर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक करण गायकर तुषार जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत.

अकलुज प्रांतधिकारी कार्यालय येथे माळशिरस तालुका मराठी पत्रकार संघ व अकलुज शहर पत्रकार संघ यांच्या वतीने विविध मागण्यासाठी निदर्शने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या