25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home महाराष्ट्र मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मनसेच्या इशा-याची जेफ बेझोस यांच्याकडून दखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही ऑनलाइन शॉपिंगसाठीची एक महत्त्वाची ई कॉमर्स कंपनी आहे. ऍमेझॉन ऍपने मराठी भाषेचा समावेश केला आहे. मनसेने ऍमेझॉनला खळ्ळ खटॅकचा इशारा दिल्यानंतर ऍमेझॉन इंडियाने नमते घेतले आहे. यूएसचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्स माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर ऍमेझॉनने मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश करण्यास संमती दिली आहे. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी मनसेच्या इमेलची दखल घेतली आहे. ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी २० दिवस लागणार आहेत.

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश करण्याबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी पाठवलेल्या इमेलला कंपनीने उत्तर दिले होते़ त्यानंतर एक बैठकीही झाल्या. या ईमेलचा स्क्रिन शॉट अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. जेफ बेझोस आपला इमेल मिळाला आहे, ऍमेझॉन ऍपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला याची माहिती दिली आहे असे ऍमेझॉनच्या वतीने कार्तिक यांनी लिहिले आहे. ऍमेझॉन डिजिटल सेवेत मराठी भाषेला प्राधान्य द्या या मनसेच्या आग्रही मागणीची ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनीही दखल घेतली आहे. राजसाहेब म्हणतात तसे तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेते, असे वाक्य अखिल चित्रे यांनी त्यांच्या ट्विटरवर पोस्ट केले आहे.

ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही इ कॉमर्स कंपन्यांनी त्यांच्या ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अन्यथा मनसे या दोन कंपन्यांची दिवाळी मनसेच्या पद्धतीने साजरी करेल असा इशारा १५ ऑक्टोबरला देण्यात आला होता. त्यानंतर या दोन्ही कंपन्यांनी नमते घेतले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या