सातारा : मराठी भाषेवर अमाप प्रेम करणा-या दिलीप पुराणिक यांनी चक्क पाकिस्तानमधल्या मुलांना विशेषत: कराची येथील मराठी कुटुंबियांमध्ये मराठी भाषेचे सखोल ज्ञान देण्यासाठी प्रयत्न केला. लॉकडाऊनचा पूरेपूर फायदा उठवत त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. आता तर सुमारे ७५ वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचा चंग बांधला आहे.
पुढील महिन्यात येणा-या २७ फेब्रुवारीला म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिनी सातारा येथील एका समूह कराचीतील मराठी समुदायासोबत मराठी भाषा गौरव दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करणार आहेत. त्यासंबंधीची झूमच्या माध्यमातून एक बैठक येत्या रविवार दि़ २४ रोजी आयोजित केली गेली आहे. मराठी भाषेवर अमाप प्रेम करणा-या पुराणिक यांनी चक्क पाकिस्तानमधल्या मुलांना विशेषत: कराची येथील मराठी कुटुंबियांमध्ये मराठी भाषेचे सखोल ज्ञान देण्यासाठी प्रयत्न केला. लॉकडाऊनचा पूरेपूर फायदा उठवत त्यांनी हा उपक्रम राबविला आहे. आता तर सुमारे ७५ वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्याचा चंग बांधला आहे.
पाकिस्तानातल्या मराठी कुटुंबाची मराठी शुद्ध असावी यासाठी त्यांच्याशी सातत्याने मराठी बोलावे लागणार आहे. या संकल्पनेतून तेथील कुटुंबियांशी, मुलांशी झूमच्या माध्यमातून एक बैठक घेतली जाणार आहे. त्यासाठी साता-यातील शिवराज्यभिषेक दिन उत्सव समितीने पुढाकार घेतला आहे. या सर्वांना अनेक मराठी भाषेवर प्रेम करणा-यांचे सहकार्य मिळत आहे. पाकिस्तानमधील शे पाचशे कुटुंबांना मराठी भाषेवर प्रेम असल्याचे त्यांचे लक्षात आले. परंतु शुद्ध मराठी भाषा मुले बोलत नसल्याने तसेच उर्दु भाषेचा प्रभाव पडल्याने पुराणिक यांनी संबंधित मुलांकडे लक्ष देण्यास प्रारंभ केला. महाराष्ट्र पाकिस्तान मराठी सेवा संघाची स्थापना करुन पुराणिक यांचे कार्य अहोरात्र सुरु आहे. यासाठी त्यांना विशाल रजपूत, राजेश नाईक, प्रकाश गायकवाड, देवानंद सांडेकर अशा अनेक मराठीजनांचे सहकार्य लाभत आहे.
येत्या २७ फेब्रुवारीस कराचीत मराठा राजभाषा दिन साजरा करण्यासाठी ही सर्व मंडळी सरसावली आहेत. त्यासाठी येत्या रविवारी एका झूम बैठकीच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानमधील नागरिक संवाद साधतील. किमान शंभर जण या ऑनलाइन मीटिंगमध्ये सामील होणार आहेत. त्यातून मुलांसाठी कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन करणे असे उपक्रम घेण्याचे निश्चित होईल. या बैठकीत सुमारे शंभरजण सहभागी होतील असा अंदाज पुराणिक यांनी व्यक्त केला आहे.
भंडारा अग्नितांडव : जिल्हा शल्य चिकित्सकासह तिघे निलंबित, तिघांना कायमचे घरी पाठवले !