34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeमहाराष्ट्रमराठी लोकांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करावी - राज ठाकरेंची मराठी बांधवांना विनंती

मराठी लोकांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करावी – राज ठाकरेंची मराठी बांधवांना विनंती

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त सर्व मराठी भाषिकांनी किमान आपली स्वाक्षरी तरी मराठीमध्ये करा असे आवाहन केले आहे. दादर येथे मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी स्वाक्षरी मोहीम या कार्यक्रमाला राज यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठी भाषिकांनी आपली स्वाक्षरी मराठीमध्ये केली तर मराठी भाषा टिकण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.

मराठी स्वाक्ष-यांच्या मोहिमेचा मराठी संवर्धनासाठी किती फायदा होईल असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राज यांनी, हा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा घेतला नाही असे म्हटले. तसेच पुढे बोलताना राज यांनी, दरवर्षी हा कार्यक्रम होत असला तरी या वर्षी आम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करण्याचे ठरवले. मराठी बांधवांना माझी इच्छा आणि विनंतीही आहे की आपली स्वाक्षरी मराठीमध्ये झाली तर सतत आपल्या मनामध्ये आपण मराठीमध्ये, मराठी भाषेसाठी काहीतरी करतोय याची खूणगाठ बांधली जाते. एक मनात राहतं की मी मराठीत सही करतोय. माझ्या पासपोर्टपासून इतर ठिकाणीही मराठीमध्ये सही आहे.

त्यामुळे इतर लोक जेव्हा बघतात तेव्हा त्यांना पण वाटतं की ही वेगळी सही आहे. मी माझ्या पत्रातही म्हटलं आहे की प्रत्येक वेळेस असं आसवं गाळत बसणं की मराठीचं काय होणार.. मराठीचं काय होणार?, याऐवजी काही गोष्टींची सुरुवात करणं गरजेचं आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपली बँक खाती आणि इतर ठिकाणी जाऊन सांगा की आजपासून ही माझी मराठीमधली सही असेल. अशा गोष्टी सुरू झाल्या तरच या गोष्टी (मराठी संवर्धनासंदर्भातील गोष्टी) पुढे जातील, असे सांगितले.

 

अभर्काला अनाथ आश्रमात सोडताना पोलिसांच्या डोळ्यात अश्रू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या