छ. संभाजीनगर : राज्याचे रोहयो मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या घरावर आज अचानक वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा धडकला. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांना अडवत ताब्यात घेतले.
भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात अतिक्रमण काढल्याने बेघर झालेल्या ६४ कुटुंबातील सदस्यांचे पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.