22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रउद्या सामूहिक राष्ट्रगीत गायन

उद्या सामूहिक राष्ट्रगीत गायन

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन कालच पार पडला. देशपातळीवर गेल्या वर्षभरापासून आपण स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. त्याचाच भाग म्हणून आता राज्य सरकारनं उद्या सामुहिक राष्ट्रगीत गायनाचं आवाहन केलं आहे. यासाठी सरकारी परिपत्रकच काढण्यात आलं आहे.

सरकारनं आपल्या अध्यादेशात म्हटलं की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सर्व नागरिकांनी समूह राष्ट्रगीताचं गायन करावं. यासाठी उद्या आहे त्या ठिकाणी थांबून सकाळी ११ वाजता राष्ट्रगीत म्हणावं. यामध्ये राज्यातील शासकीय, खासगी तसेच इतर सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये स्थानिक शिक्षण संस्था, विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील. खासगी अस्थापना, व्यापारी प्रतिष्ठानं यांनीही यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन सरकारनं केलंय. याबाबतचा जीआर देखील काढण्यात आला आहे.

पतंप्रधानांनी हर घऱ तिरंगा हे अभियान राबवलं होतं याला चांगला प्रतिसाद देशभरातून मिळाला होता. यापार्श्वभूमीवर आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं सामुहिक राष्ट्रगीत गायनाचं आवाहन केलं आहे. पण आता याला कसा प्रतिसाद मिळतो हे पहावं लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या