26.9 C
Latur
Sunday, January 24, 2021
Home महाराष्ट्र गॅस सुरू करत असताना भीषण स्फोट : आजूबाजूच्या अनेक इमारतींना हादरे बसले

गॅस सुरू करत असताना भीषण स्फोट : आजूबाजूच्या अनेक इमारतींना हादरे बसले

एकमत ऑनलाईन

पुणे : वडगावशेरी येथे बुधवारी सकाळी सहा वाजता घरगुती गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे इमारत कोसळली. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी एक महिला चहा बनवण्यासाठी गॅस सुरू करत असताना हा भीषण स्फोट झाला. वडगावशेरीच्या गणेशनगर भागातील या घटनेनंतर आजूबाजूच्या अनेक इमारतींना हादरे बसले.

या दुर्घटनेत बाळासाहेब आप्पाजी भोंडवे (वय 50), नीरा बाळासाहेब भोंडवे (वय 45), अनुराधा बाळासाहेब भोंडवे (वय 20) आणि अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्यातील वडगाव शेरी परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत आईवडील आणि मुलगी जखमी झाले आहेत. आज पहाटे ही घटना घडली आहे. यात घराचे मोठे नुकसान झाले असून, मुलगी तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली आहे.

भोंडवे कुटुंबिय वडगाव शेरी परिसरातील गणेशनगर येथे राहते. तिसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. दरम्यान पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास काम करत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की घराच्या भिंती देखील कोसल्या आहेत. त्यात अनुराधा ही तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळली. तर तिचे वडील आणि आई दोघेही यात गंभीर जखमी झाले आहेत. वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले आहे. नागरिकांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना खडगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर घरातील आग विझवत पडलेली भिंत बाजूला काढली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून काम सुरू असल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बोलवली महत्वाची बैठक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,416FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या