24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिक शहरातील मास्टर मॉलला भीषण आग

नाशिक शहरातील मास्टर मॉलला भीषण आग

एकमत ऑनलाईन

नाशिक : : नाशिक शहरातील गंजमाळ परिसरात असणा-या मास्टर मॉलला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत लाखोंचा माल जाळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझविण्यासाठी अग्निशनम विभागाच्या दोन गाड्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

नाशिकच्या गंजमाळ परिसरातल्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मास्टर मॉलच्या तिस-या मजल्यावर आग लागली. मात्रआजूबाजूला गर्दी कमी होती. यावेळी तिस-या मजल्यावरून धुराचे लोट येत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही बाब पोलिसांसह महापालिकेच्या अग्निशामक दलाला कळविण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या सातपूर, पंचवटी, तसेच मुख्यालयासह के के वाघ केंद्र या चार ठिकाणचे चार बंब सुमारे वीस जवानांस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनंतर सुमारे दोन ते तीन तास आग विझवण्यासाठी अधीक्षक अग्निशामक दल राजेंद्र बैरागी यांचे नेतृत्वाखाली खोडे, लासुरे पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

दरम्यान धूर खूप जास्त असल्यामुळे तसेच बंबला पोहोचण्यासाठी मार्ग नसल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. यावेळी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांनी आपल्या पथकासह मदत केली. तरी उशिरापर्यंत आग विझवण्याचे सुरू होते. या घटनेत जीवित हानी नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या