30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeमहाराष्ट्रवसईच्या विरार कोविड रुग्णालयात भीषण आग; १३ रुणांचा होरपळून मृत्यू

वसईच्या विरार कोविड रुग्णालयात भीषण आग; १३ रुणांचा होरपळून मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : नाशिकची ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने २४ जणांचा मृत्यू झाला होता हि घटना ताजी असताना काळ मध्य रात्री वसई येथील कोविड हॉस्पिटलमध्ये आग लागली. हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

पालघर जिल्ह्यातील वसईच्या कोविड सेंटरमध्ये ही आग लागली आहे. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या अतिदक्षता विभागात अचानक रात्री ३ च्या सुमारास लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षता विभागातील १३ रुग्ण यामध्ये दगावले आहेत. अग्निशमन विभागाने आग विझवली आहे. या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे, असे वसई विरार महापालिकेच्या कोरोना कंट्रोल रुमकडून सांगण्यात आले आहे. अन्य रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले आहे.

महिनाभरात ३ घटना
मागील महिन्याभरात सुमारे ५३ रुग्णांना अशा दुर्घटनांमध्ये प्राण गमवावा लागलाय. २५ मार्चला भाडूंपच्या कोविड सेंटमध्ये आग लागली होती. या अपघातात ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता. २१ एप्रिलला नाशिक महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाली. यावेळी व्हेंटिलेटरवर असलेल्या २९ रुग्णांचा बळी गेलाय. विरारमध्ये आज विजय वल्लभ कोविड सेंटरमध्ये आग लागलीय. यात १३ रुग्ण दगावले आहेत.

‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ महाराष्ट्राकडे रवाना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या