24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रदोन दिवसांत माविआ सरकार स्थापन झाले

दोन दिवसांत माविआ सरकार स्थापन झाले

एकमत ऑनलाईन

सातारा : गेल्या अडीच वर्षांत एकही निर्णय शिवसैनिकांच्या न्यायासाठी झाला नाही. राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर युती करून सरकार स्थापन केले. त्यांनी शिवसेना खाऊन टाकली. शिवसेना पक्ष संपवण्यासाठीच या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी कामे केली असल्याची टीका राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

येथे मुख्­यमंत्री एकनाथ शिंदे प्रणीत शिवसेना गटाच्­या मेळाव्­यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देसाई म्हणाले, सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेवेळी दिला होता. त्या वेळी आम्हाला वाटले भाजप-शिवसेना युती होणार आहे. मात्र, त्यानंतर दोन दिवसांत तो शब्द फिरला आणि राष्ट्रवादी व काँग्रेसबरोबर युती करून सरकार स्थापण्­याची घोषणा त्­यांनी केली. त्­याला एकनाथ शिंदेसह सर्व आमदारांनी विरोध केला होता. शिवभोजन केंद्र सुरू करण्याची संकल्पना उद्धव ठाकरे यांनी मांडली. अडीच वर्षांत एकही शिवसैनिकाला शिवभोजन केंद्र मिळाले नाही.

राष्ट्रवादीने यादी दिली की मंजुरी मिळायची
राष्ट्रवादी नेत्यांनी यादी दिली, की मंजूर असा सर्व कारभार अडीच वर्षे सुरू होता. या अडीच वर्षांत कोणताही निर्णय शिवसैनिकाला न्यायासाठी झाला नाही. आज मातोश्रीवर सर्व जण खुलेपणाने जात आहेत; पण गेल्­या अडीच वर्षांतील चित्र वेगळे होते. मुख्यमंत्री दालनात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. मात्र, उपमुख्यमंत्री दालनात कोविड नव्हता असे चित्र अनेक वेळा दिसल्­याची टीकाही देसाईंनी यावेळी केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या