16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमहाराष्ट्रलातूर जिल्ह्यात आयुष उपचाराचे पहिले कोविड केअर सेंटर सुरु करणार - वैद्यकीय...

लातूर जिल्ह्यात आयुष उपचाराचे पहिले कोविड केअर सेंटर सुरु करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

एकमत ऑनलाईन

मुंबई, दि.४ (प्रतिनिधी) देशात व राज्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. कोविड रुग्णांवर उपचारासाठी ऍलोपॅथीचा प्रामुख्याने उपयोग करण्यात येत आहे. पण येत्या काळात लातूर जिल्ह्यात आयुषच्या सर्व डॉक्टरांना एकत्र करून पहिले कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज सांगितले.

आयुष टास्कफोर्सच्या सदस्यांसमवेत अमित देशमुख यांनी आज ऑनलाईन बैठकीत संवाद साधला. देशमुख म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून अधिक काळ आपण कोविडच्या संकटाशी सामना करत असून, अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. यामुळेच कोविड केअर सेंटरमध्ये आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीचा उपयोग रुग्णांसाठी करून एक पायलट सेंटर लातूरमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या काळात कोविड रुग्णांची संख्या तातडीने कमी करणे आवश्यक आहे. कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी मार्फत उपचार देता येऊ शकतात. त्यासाठी एस.ओ.पी.तयार करण्याचे काम आयुष संचालनायामार्फत करण्यात यावे. जेणेकरून राज्यात आयुष संचालनायाअंतर्गत येणाऱ्या डॉक्टरांना या एस.ओ. पी.अंतर्गत कोविड रुग्णांवर उपचार करता येऊ शकतील. आयुर्वेद आणि उपचार पद्धतींचा उपयोग कोविड रुग्णांच्या उपचारासाठी होऊ शकतो. त्यामुळे ही एस.ओ.पी. वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आयुष संचालक यांनी तयार करावी, अशा सूचना अमित देशमुख यांनी दिल्या.

सध्या दिल्ली आणि जयपूरमध्ये कोविडसाठी आयुर्वेद उपचाराला मान्यता देण्यात आली असल्याने हाच पॅटर्न महाराष्ट्रातही राबविण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करण्यात येईल. यामुळे आयुष डॉक्टरांचे मोठे संख्याबळ उपलब्ध होणार आहे. आयुष अंतर्गत येणाऱ्या पॅथीना उपचारांसाठी परवानगी द्यावी असे केंद्र शासनाकडे पत्र आयुष संचालनायामार्फत देण्यात येईल, असेही श्री देशमुख यांनी सांगितले. येणाऱ्या काळात लातूरमध्ये प्रामुख्याने इंटिग्रेटेड आयुष क्लिनिक सुरु करण्याबाबत विचार असून याबाबतच्या अंमलबजावणीसाठी आयुष संचालयानाने पुढाकार घ्यावा. कोविडसाठी उपचार पद्धती निरनिराळ्या असून ऍलोपॅथी यामध्ये प्रमुख भूमिका निभावत असली तरी अल्टरनेटीव्ह थेरपी निरनिराळ्याअसू शकतात. आयुष संचालनायांतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या पॅथीच्या डॉक्टरांनी या क्षेत्रात काम आणि संशोधन केलेले आहे. त्यामुळे आपल्या संशोधनाच्या कामाचा, ज्ञानाचा उपयोग या काळात करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या काळात होमिओपॅथिक आयुर्वेदिक, औषधे यांना मान्यता देताना त्यांनी मानके परिपूर्ण केली आहेत का हे तपासून घेणे आवश्यक आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज आयुष टास्क फोर्स सदस्यांसोबत झूम मीटिंगद्वारे चर्चा केली. आज करण्यात आलेल्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने, आयुष संचालक डॉ कुलदीप राज कोहली,डॉ झुबैर शेख, डॉ मनीष पाटील, डॉ जवाहर शाह, डॉ शुभा राऊळ, डॉ.उर्मिला पिटकर,डॉ उदय कुलकर्णी, डॉ मनोज राजा, डॉ जसवंत पाटील,डॉ राजश्री कटके, डॉ संजय लोंढे, डॉ अमित दवे, डॉ राजेंद्र निरगुडे, , डॉ.नवीन पावस्कर, डॉ पुरुषोत्तम लोहिया, डॉ.हरीश बी सिंग,जयंत वकनाली आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या कलाकारांना शासनाकडून संपूर्ण मदत करणार !
कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. या कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरि मदत करण्यात येईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ताबडतोब प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिल्या.

सांस्कृतिक कार्य विभागातील अधिकाऱ्यांच्या, दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. कोरोनामुळे लागलेल्या टाळेबंदीमुळे व अंशतः टाळेबंदीमुळे जवळपास वर्षभर कलाकारांना कला सादर करता आलेली नाही. ते आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याची निवेदने प्राप्त होत आहेत. तसेच काही कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून त्यांच्या कुटुंबियांना आधार देणे आवश्यक आहे. या सगळ्यांचा सहानुभतीपूर्वक विचार करून त्यांना दिलासा मिळेल, अशा उपाययोजना प्रस्तावित कराव्यात, अशा सूचनाही देशमुख यांनी दिल्या. याकाळात नाट्य, चित्रपट कलावंतांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांचे अनुदानाचे प्रस्ताव त्वरित मार्गी लावण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले. बैठकीला विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे बैठकीला उपस्थित होते.

कोरोनामुक्त रुग्णांना लसीचा एकच डोस पुरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या