मुंबई : राज्यातील खासदारांनी सीमा प्रश्नी एकजूट दाखवावी तसेच यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहनही केले. खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडे राज्यातील विविध प्रश्नांवर आग्रह धरण्याच्या उद्देशाने सह्याद्री अतिथीगृह येथे लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
खासदारांच्या राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयावर मार्ग काढला जाईल. विभाग आणि विषयनिहाय खासदारांच्या समित्या स्थापन करून विविध बाबींचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यातील जनतेला खासदारांकडूनही अपेक्षा आहेत. राज्यातील जनतेचे प्रतिनिधित्व करताना त्या जनतेच्या हिताचे प्रश्न प्राधान्यक्रम ठरवून सोडवले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येक खासदाराने केंद्र शासनाकडून राज्य शासनाला जास्तीत जास्त निधी मिळवून दिला पाहिजे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
मराठा आरक्षणाबाबतही चर्चा
मराठा आरक्षणाबाबत ५ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. सर्वोच्च न्यायालयात केंद्र शासनालाही बाजू मांडावी लागणार आहे. मधल्या काळात सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधानांची भेट त्यांना निवेदन द्यावे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
एकनाथ खडसेंना तात्पुरता दिलासा; सोमवारपर्यंत अटक नाही