मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थान असलेल्या क्रिस्टल टॉवरच्या टेरेस आणि शरण क्षेत्र येथे ६ महिन्यांपासून बैठका होत होत्या, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. यावरून या बैठकांचे कारण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा कट रचण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती का, याचा तपासही मुंबई पोलीस तर करत आहेत.
गेल्या पाच महिन्यांपासून सदावर्ते यांनी एसटी कर्मचा-यांना मदत करण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बरेच दुखावलेले एसटी कर्मचारी ५० पेक्षा जास्त लोकांच्या गटात सदावर्तेकडे जायचे. आंदोलनामुळे अनेकांना निलंबित करण्यात आले, तर काहींवर कारवाई करून त्यांचे पगार कापण्यात तसेच इतर अनेक गोष्टी करण्यात आल्या. हे सर्व कर्मचारी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आपल्या समस्या घेऊन सदावर्ते यांना भेटण्यासाठी येत होते. त्यानुसार लोकांच्या एका गटाला भेटण्यासाठी त्यांनी टेरेस आणि आश्रय क्षेत्राचा वापर बैठक आयोजित करण्यासाठी केला होता, असे तपासातस समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुराव्यासाठी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले आहे. सर्वात जास्त आणि नियमित भेटीमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस तपासात करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, तपासत अशी माहिती समोर येत आहे की, हल्ल्याबाबतची बैठक नुकतीच ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत त्या दिवशी बैठकीसाठी गेलेल्यांना अटक करत त्यांची चौकशी सुरु केली आहे.
दरम्यान, अटक केलेल्या आरोपींपैकी एक अभिषेक पाटील याने न्यायालयात दावा केला आहे की, त्याचा हल्ल्याशी काहीही संबंध नाही नसून हा कट सदार्वतेंनी रचल्याचे सांगितले आहे. मात्र, सदावर्ते यांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. त्यांनी आपण फक्त पीडित कर्मचा-यांना विना पैसे मदत केल्याचे म्हटले आहे.