24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रमहिलांपेक्षा पुरुष अधिक पीडित : बरखा त्रेहन

महिलांपेक्षा पुरुष अधिक पीडित : बरखा त्रेहन

एकमत ऑनलाईन

नागपूर : नवी दिल्ली येथील पुरुष आयोग संस्थेच्या अध्यक्षा बरखा त्रेहन यांनी देशामध्ये महिलांना झुकते माप दिले गेल्यामुळे पुरुषांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत. महिलांपेक्षा पुरुषच अधिक पीडित आहेत, असा दावा केला आहे.

महिलांना आजही अबला समजले जाते. त्यामुळे महिलांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. महिला कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. महिला आयोग व विविध विशेष कायदे आहेत. परिणामी, महिला सुरक्षित झाल्या; पण यातून पुरुषांवरील अत्याचार वाढायला सुरुवात झाली. आजच्या काळात पुरुषपीडित महिलांपेक्षा, महिलापीडित पुरुषांची संख्या जास्त आहे. परंतु, पुरुषांवरील अत्याचारांना कुणीच गांभीर्याने घेत नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. करिता, पुरुष तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत. त्यांनाही आता विशेष संरक्षणाची गरज आहे. त्यामुळे देशात पुरुषांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू करणे व पुरुष आयोग स्थापन करणे आवश्यक आहे, असे बरखा यांनी सांगितले.

बरखा यांनी विविध आकडेवारी सादर करून महिलांपेक्षा पुरुष अधिक पीडित असल्याचे स्पष्ट केले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या २०२० मधील अहवालानुसार, देशात आत्महत्या करणा-यांपैकी ७१ टक्के संख्या पुरुषांची आहे. यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ही संख्या महिलांपेक्षा अडीचपट जास्त आहे. दर नऊ मिनिटात एक विवाहित पुरुष आत्महत्या करतो, तसेच जगातील कौटुंबिक हिंसाचार पीडित पुरुषांमध्ये भारत तिस-या क्रमांकावर आहे, अशी माहिती बरखा यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या