37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात पारा चाळीशी गाठणार - हवामान खात्याचा इशारा

राज्यात पारा चाळीशी गाठणार – हवामान खात्याचा इशारा

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीने एक्झिट घेतली आणि उन्हाने अचानक एन्ट्री घेतल्याचे दिसत आहे़ राज्यातील तापमानाचा पारा वाढला असून मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील ब-याच जिल्ह्यातील पहिल्याच आठवड्यात पा-याने चाळीशी गाठल्याचे दिसत आहे़ अचानक झालेल्या हवामान बदलाचा परिणाम सर्वच जिल्ह्यात जाणवू लागला आहे, विशेष म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्रातसह विदर्भातदेखील पा-याने उच्चांक गाठला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यात आगामी काही दिवस लहरी हवामानाचा फटका बसणार असल्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, मराठवाड्याला उकाड्यापासून किंचितसा दिलासा मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे़

राज्यामध्ये हिवाळ्यात यंदा काही भागात कडाक्याची थंडी पडली़ त्यानंतर अचानक काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अवकाळी पावसाने बळीराजासह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र आता या गारठ्यासह उबदारपणा कमी होताना दिसत असून मध्य महाराष्ट्रातील ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ होत आहे. त्यामुळे या भागात किमान आणि कमाल तापमानात अशंत: वाढ नोंदविण्यात आली आहे.

विदर्भात तीव्रता वाढली
राज्यातील अकोला, बुलढाणा, वर्धा या जिल्ह्यात सरासरी कमाल तापमानाच्या तुलनेत चार अंश सेल्सियस पर्यंत वाढ झाल्याने विदर्भात तापमानाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे़ तर चंद्रपूर, वाशिम आणि अकोला या तीन जिल्ह्यात आगामी पाच तिवस उन्हाचा तडाखा जाणवणार असल्याचे देखील हवामान खात्याकडून सांगितले जात आहे.

विदर्भ वगळता इतर ठिकाणी तापमान कमी असणार
विदर्भातील तापमान समान्य तापमानापेक्षा ४ ते ६ अंश सेल्सिअसने अधिक आहे. शुक्रवारी विदर्भात ब्रह्मपुरी (३९.०८ अंश सेल्सियस) या ठिकाणी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर ३९.०२ वाशीम ३९, अकोला ३९.०१ आणि नागपूर ३७.०६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईतील आर्द्रता वाढली
फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील आर्द्रता वाढली असून राज्यात यंदा कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात पारा चढता राहणार असल्याचेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या भागात पुढील ४ दिवस हवामान कोरडे राहणार असून, तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

टाईम्सच्या मुखपृष्ठावर भारतीय नारी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या