महाविकास आघाडीला आणखी एक धक्का!
पुणे : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक गाजलेल्या म्हाडा, आरोग्य आणि टीईटी घोटाळ््याचा ईडीकडून समांतर तपास केला जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे तपासासाठी ईडीने पुणे पोलिसांकडून मागवून घेतली आहेत.
टीईटी, म्हाडा, आरोग्य भरती गैरव्यवहार प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेकडून करण्यात आला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त भाग्यश्री नवटके आणि सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला होता. या प्रकरणात उच्चपदस्थ अधिकारी तसेच गैरव्यवहार प्रकरणात गुंतलेल्या दलालांना अटक करण्यात आली होती. गैरव्यवहार प्रकरणात काळ््या पैशांचे हस्तांतरण झाल्याचा संशय असून ईडीकडून या प्रकरणाचा समांतर तपास केला जाणार आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रे ईडीने मागवून घेतली आहेत, असे सायबर गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितले.
दरम्यान, ईडीने पुणे सायबर पोलिसांना पत्र पाठवले होते आणि या प्रकरणी सगळे कागदपत्र मागवली होती. त्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी तपासाची सर्व कागदपत्रे ईडीकडे पाठवली आहेत.
म्हाडा, टीईटी आणि आरोग्य भरती प्रकरणात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. या घोटाळ््यात लाखो रूपयांची उलाढाल झाल्याचे उघड झाले होते. त्याचबरोबर शिक्षण विभागातील अधिकारी तुकाराम सुपे यांचा म्हाडा पेपरफुटी घोटाळ््यात हात असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.