21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रशिंदेंकडून काल माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील हे समजणारही नाही :...

शिंदेंकडून काल माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील हे समजणारही नाही : उद्धव ठाकरे

एकमत ऑनलाईन

मुंबई : फडणवीसांनी शिंदेंकडून काल माईक हिसकावला, उद्या आणखी काय हिसकावतील हे समजणारही नाही अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी हा टोला लगावला आहे.

सोमवारी एका पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरुन माईक घेऊन स्वत: उत्तर दिले होते. उद्धव ठाकरे यांनी वेगवेगळ्या बैठकींचा सपाटा लावण्यात आला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल एका पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांसमोरील माईक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिसकावून घेतला. आज माईक हिसकावला, उद्या काय काय हिसकातील हे काही जणांना समजणार नाही.

उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, काल विधानसभेमध्ये रिक्षा सुसाट सुटली होती, त्याचा ब्रेक लागतोय की नाही, त्याचा अपघात होतोय की काय असे अनेकांना वाटत होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या