24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमिलिंद नार्वेकरांची गच्छंती होणार?

मिलिंद नार्वेकरांची गच्छंती होणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत अनेक बदल केले जात आहेत. राजकीय समीकरणांसोबत शिवसेना पक्षातील अंतर्गत अनेक गोष्टींमध्येही बदल केले आहे. या सर्वांमध्ये आता उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळ असणारी व्यक्ती म्हणून मिलिंद नार्वेकरांची ओळख असून, बंडखोरीनंतर नार्वेकरांवर मध्यस्थी करण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता नार्वेकरांच्या जागी एका कट्टर शिवसैनिकावर मोठी जबाबदारी देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांमुळे नार्वेकरांची गच्छंती होणार का? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

त्यात नुकताच २१ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती रवी म्हात्रे अनेकदा पाहण्यास मिळाले होते. त्यामुळे ठाकरेंचा उजवा हात मानल्या जाणा-या नार्वेकरांची जागा आता रवी म्हात्रे घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अर्थात याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. मात्र, या बदलाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या