23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रदूध दर आंदोलन चिघळणार; १ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा

दूध दर आंदोलन चिघळणार; १ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात दूध आंदोलनाने राजकारण ढवळून निघाले आहे. राज्य सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्यास भाजपा, रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासप आणि शिवसंग्राम महायुतीतर्फे १ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. महायुतीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी दिली.

या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, अविनाश महातेकर, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महायुतीतर्फे २१ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांनाही पाठवण्यात आले. सरकारने या मागण्या मान्य न केल्यास १ ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महायुतीतर्फे सरकारला देण्यात आला होता. सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने महायुतीच्या घटक पक्षांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन संपूर्णपणे अंिहसक पद्धतीने असेल, असेही महायुतीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

लॉकडाऊनमुळे दूध उत्पादकांचे नुकसान
लॉकडाऊनमध्ये मागणी कमी झाल्याने दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडला आहे. हॉटेल व अन्य व्यावसायिकांकडून खरेदी थांबल्याने दुधाचे भाव १६, १७ रु. पर्यंत घसरल्याने उत्पादन खर्चही वसूल होत नाही, अशी स्थिती आहे. राज्य सरकारने २५ रु लिटर प्रमाणे दूध खरेदी करण्याची घोषणा केली होती. मात्र, ठराविक दूध संघांकडूनच शासनाची दूध खरेदी केली जात आहे.

प्रतिलिटर १० रुपये अनुदान देण्याची मागणी
परिणामी राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे. अशा स्थितीत दूध उत्पादक शेतक-यांंना प्रतिलिटर १० रू. अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रतिकिलो ५० रू. अनुदान द्यावे. तसेच गाईच्या दुधाला ३० रू. दर द्यावा, अशी मागणी होत आहे.

Read More  धक्कादायक घटना : नोकरी जाण्याच्या भीतीने आत्महत्या

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या