24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रदूध, दह्याचे दर वाढणार?

दूध, दह्याचे दर वाढणार?

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकीकडे महागाई वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दरही सणासुदीच्या तोंडावर वाढत आहेत. आधीच दुधाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामध्ये पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे दूध आणि दह्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

डेअरी प्रोडक्ट विकणा-या मदर डेअरी कंपनीने दुग्ध उत्पादनाच्या किमती वाढण्याचा विचार केला आहे. याबाबत कंपनीच्या अधिका-यांनी तसे संकेत दिले आहेत. सध्याच्या आर्थिक वर्षात मदर डेअरीमधील प्रोडक्टवर २० टक्के किंमत वाढण्याची शक्यता आहे. यामागचे कारणदेखील कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले आहे. मदर डेअरीचा टर्नओव्हर १५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. याशिवाय मदर डेअरी फळे आणि भाज्यांच्या क्षेत्रातही उतरले आहे. त्यामुळे तिथल्या किमतींवर याचा काय परिणाम होणार ते पाहावे लागेल.

नुकतेच दूध-दह्याचे दर वाढवण्यात आले होते. डिझेलचे दर वाढल्याने दुधाचे दरही वाढल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले. दरवाढीत शेतक-यांना फायदा होत असल्याचा दावा कंपनीने केला. मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलिश विक्री वाढीबद्दल सांगतात की, चालू आर्थिक वर्षात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत १५ टक्क्यांहून अधिक वाढ होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या