24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्रमिनी बसचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

मिनी बसचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

एकमत ऑनलाईन

मिनी बसचा चक्काचूर :  बसमध्ये काही लोक अजूनही अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू

नवी मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कळंबोली इथं भीषण अपघात झाला आहे. कर्नाटक येथून प्रवाशी घेऊन येणाऱ्या खाजगी बसने कळंबोली मॅक्डोनाल्ड येथे महामार्गावर बंद पडलेल्या बसला मागून धडक दिल्याने बसमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

कर्नाटकावरून येणाऱ्या बसमधून 9 लोक प्रवास करत होते. यातील 5 जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात झाल्यानंतर पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

Read More  देशातील कोरोना बाधितांची संख्या ९० हजारांवर

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मिनी बसचा चक्काचूर झाला आहे. बसमध्ये काही लोक अजूनही अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.

अपघातात एक महिला जागीच ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात होण्याआधी पुणे-सोलापूर महामार्गावरही भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली आहे. तर लहान मुलगी आणि एक पुरूष गंभीर जखमी झाला आहे. जखमींना इंदापूरमधील शासकीय रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आलं आहे. महामार्गावर कार आणि स्कुटीची धडक होऊन हा अपघात झाला. कोरोनाच्या दहशतीमुळे लोक शहर सोडून आपल्या गावी प्रवास करत आहेत. हा अपघातातही कोरोनाच्या दहशतीमुळे गावाकडे निघालेल्या महिलेचाच बळी गेला आहे. मुंबईवरुन कर्नाटकला जात असताना अपघात झाला. अद्यापर्यंत मृत आणि जखमी व्यक्तींची नावे समजू शकली नाहीत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या