27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्रीमहोदय रोजगार फक्त कागदोपत्रीच

मंत्रीमहोदय रोजगार फक्त कागदोपत्रीच

एकमत ऑनलाईन

एका शेतक-याने खोलली मग्रारोहयोची पोल
अमरावती : मंत्री महोदय वर्षभरातील पावसाळ््यातील दिवस सोडता उर्वरित २६५ दिवस हाताला पुरेसा रोजगार नाही, मग्रारोहयोचा रोजगार नुसता कागदोपत्रीच दाखविण्यात येतो, अशी पोलखोल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर आज एका शेतक-याने करीत यंत्रणेचे वाभाडेही काढले.

आदिवासी शेतक-यांना भेडसावणारे ज्वलंत प्रश्न तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीचा अगदी बारकाईने अभ्यास करून घेण्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार बुधवारी रात्री एका शेतक-याच्या घरी मुक्कामाला थांबले होते. दुस-या दिवशी पहाटेपासूनच त्यांनी संवादाची अनेक सत्रे झाली. त्यावेळी आज शेतक-यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शिवाय आदिवासींचे घर ते त्यांची शेती असा प्रवासही केला. या दरम्यान शेतक-यांशी झालेली चर्चा ही माझ्यासाठी अत्यंत मोलाची असून त्याचा वापर प्रभावी कृषी धोरणासाठी केला जाईल. मंत्री सत्तार यांचा पहिला प्रश्न होता..तुम्ही शेतात नेमकी, कोणकोणती पिके घेता? यावर ग्रामस्थ म्हणाले पारंपरिक तांदूळ (भात), ज्वारी, उडीद, मक्का आणि तेलबियाणे असलेले सोयाबीन. त्यावर मंत्र्यांनी पुढे अनेक प्रश्न केले.

सत्तारांकडून प्रश्नांची सरबत्ती
मंत्री सत्तारांनी शेतक-यांना प्रश्न विचारले की, प्रतिहेक्टर किती खर्च लागतो, त्यातून सरासरी उत्पन्न किती मिळते, कृषी खात्याकडून तुम्हाला या भागात शासकीय योजनेचा लाभ मिळतो का? वेळेवर पीक कर्ज अथवा नुकसान भरपाई मिळते का ? प्रती व्यक्तीमागे किती मजुरी मिळते? मग त्यातून तुमच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह नेमका कसा चालतो? सावकारी कर्ज घेता का? शेती गहाण ठेवता का? तलाठी, ग्रामसेवक गावात येतात का? गावात किती दिवस दिसतात. अशा नानाविध प्रश्नांबाबत त्यांनी अगदी रोखठोक चर्चा घडवून आणली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या