Saturday, September 23, 2023

अल्पवयीन मुलीवर शेजा-याकडून अत्याचार

मुंबई : मुंबईत अंधेरी पूर्व परिसरात एका ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या अंधेरी गुंदवली येथे राहणा-या एका सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणा-या ३० वर्षीय नराधमाने अत्याचार केला. मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या पालकांनी या प्रकरणी काल संध्याकाळी अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अंधेरी पोलिसांनी त्या नराधम तरुणाला अटक केली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्व भागातील गुंदवलीत राहणा-या सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या शेजारी राहणा-या ३० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार केला. त्यानंतर या आरोपीने पळ काढला. पीडित मुलीने संपूर्ण प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी काल संध्याकाळी अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अंधेरी पोलिसांनी आरोपीचा तपास करत त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या