22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

पुणे : दहावीत शिकणा-या विद्यार्थीनीवर चक्क स्कुलबसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडल्याने संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. घडलेल्या प्रकाराबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती. गेले अनेक वर्ष ती या बसमधून शाळेचा प्रवास करत होती. स्कूलबस चालक आणि पीडित मुलगी अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यासोबत रोज शाळेत जावं लागत असल्याने अनेकदा गंमत चालायची.

बसचालकाने पीडित मुलीला रिलेशनशिपमध्ये राहणार का? असं विचारले. त्यावेळी तिने उत्तर न दिल्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रसंगातून तिने सुटण्याचा प्रयत्न केला मात्र प्रयत्न सफल झाला नाही. काही वेळानंतर त्या स्कूलबस चालकाने तिला जबरदस्तीने जुन्या इमारतीत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या