30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home महाराष्ट्र महाराष्ट्राचा मिसळसम्राट हरपला

महाराष्ट्राचा मिसळसम्राट हरपला

एकमत ऑनलाईन

ठाणे: ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ‘मामलेदार मिसळ’चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे मंगळवारी (दि.२) अल्पशा आजारामुळे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या १५ दिवसांपासून मुर्डेश्वर आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राचा मिसळसम्राट हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

आपल्या चवीष्ट मिसळीमुळे ‘मामलेदार मिसळ’ हे ठाण्याचे वैशिष्ट्य बनले आहे. सामान्यांपासून ते राजकारणी व सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच झणझणीत त्यांच्या मिसळने मोहात पाडले आहे. मामलेदार मिसळने एवढे यश कमावण्यामागे लक्ष्मण मुर्डेश्वर यांची अथक मेहनतच कारणीभूत ठरली आहे. वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायाचा नावलौकीक लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी राज्यभर पसरवला. वडीलांच्या निधनानंतर १९५२ पासून गेली सात दशके तिचे संचालन करताना लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी अनेक प्रयोग केले. त्यांच्या कँटीनमध्ये अन्य पदार्थ मिळत असले तरी मिसळ ही या कँटीनची ओळख बनली होती.

खवय्यांच्या पसंतीनुसार पुरवठा
खवय्यांना त्यांच्या मागणीनुसार कमी वा जास्त तिखट मिसळ देण्याचा त्यांचा हातखंडा होता. ग्राहकांच्या पसंतीनुसार मिसळ तयार करतानाही त्यांनी त्यांच्या मिसळची वेगळी चव व दर्जा कधीही बिघडणार नाही, याची कायम काळजी घेतली. ‘मामलेदार मिसळ’ हा आज एक ब्रँड बनला आहे. या मिसळचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक ठिकाणांहून खास मिसळ खाण्यासाठी लोक ठाण्यात येतात. सेलिब्रिटींपासून राजकारण्यांमध्येही त्यांची मिसळ लोकप्रिय होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांचे पुत्र अमित ठाकरे आदींसह अनेक नेत्यांनी त्यांच्या मिसळची चव चाखली आहे. ठाण्यातील खाद्य ते मिष्टान्न विक्रेता संघाचे ते २७ वर्षे खजिनदार होते.

देशभरात लसीकरण नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या