24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रएमआयटी एडीटी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

एमआयटी एडीटी विद्यापीठ आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा

एकमत ऑनलाईन

पुणे : मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाचे मोठे महत्व आहे. भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगा आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून सर्वच ठिकाणी साजरा केला जात आहे.

शरीर निरोगी आणि मन शांत ठेवण्यासाठी जगभरातील बहुतेक लोक योगाचा अवलंब करतात, म्हणूनच एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग लोणी काळभोर, केंद्रिय आयुष मंत्रालय, सुर्या फाऊंडेशन, लोणी काळभोर आणि कदमवाक वस्ती ग्रामपंचायत मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान आंतरराष्ट्रीय नेचोथेरीपी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या संत श्री. ज्ञानेश्वर विश्वशांती घुमट येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी १५०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी यावेळी योग अभ्यास केला. प्रा. विक्रम तोमर, पंतजलीचे संजय भामे यांनी योग अभ्यास प्रशिक्षण दिले. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता मंगेश कराड, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. अतुल पाटील, डॉ. रामचंद्र पुजेरी, प्रा. पद्माकर फड, वनिता काळभोर, डॉ. रमाकांत कपले, डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, शिवशरण माळी, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या