24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रआमदार फुटण्याची भीती नाही

आमदार फुटण्याची भीती नाही

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यसभेच्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात बोलत होते. मुंबईत महाविकास आघाडीतर्फे बैठक बोलवली आहे. त्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. निवडणुकींच्या वेळी अशा बैठका घेतल्या जातात, असंही ते म्हणाले.

मतदान कशाप्रकारे केलं जातं, यासंदर्भातलं मार्गदर्शन केलं जातं. जेवढे उमेदवार तेवढी पसंती देण्याचा अधिकार मतदाराला असतो. आमदारांना समजावून सांगण्यासाठी या बैठका घेतल्या जातात. पक्षातील उमेदरावांबाबत काही अडचण नाही. त्यांनी मतदान केल्यानंतर आपल्या प्रतिनिधींना दाखवण्याचा अधिकार राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी दिला जातो. अपक्ष आणि छोटे पक्ष असणा-या लोकांचा प्रश्न आहे. मात्र काही वर्षांत या अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा संपर्क वाढला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असंही ते म्हणाले.

पडळकरांना आवरा
कमरेखाली बोलायची आम्हाला गरज नाही, राष्ट्रवादी वाल्यांनाच हे विचारा.. शरद पवार आणि रोहित पवार यांचा चौडीत संबंध काय? महत्वाचे म्हणजे शरद पवार यांच आता वय झालंय, त्यांनी घरी बसावं, अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी नाशिकमध्ये केली होती. पडळकरांच्या विधानावर हसन मुश्रीफ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या नेते मंडळींनी त्यांचे आघाडीचे नेते पडळकरांना रोखलं पाहिजे, असा खोचक सल्ला त्यांनी भाजपनेत्यांना दिला आहे.

कोल्हापूर पॅटर्न दिसणार
राज्यसभेच्या निवडणुकीत निवडणुकीत कोल्हापूर पॅटर्न दिसणार आहे. आमदारांची संख्या ४२ वरुन ४१ वर गेली आहे. त्यात २, ३ आमदार निवडणुकीत भाग घेणार नाही, असं दिसतंय. त्यामुळे कोटा कमी व्हायची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार देण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, असंही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या