23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात आमदारांना प्रत्येकी ८० लाखांचा निधी मिळणार

राज्यात आमदारांना प्रत्येकी ८० लाखांचा निधी मिळणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमदार विकास निधीसाठी २७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुलै आणि ऑगस्ट या २ महिन्यांसाठी प्रत्येक आमदाराला ८० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी जिल्ह्यातील विकास कामांसाठी वापरला जाणार आहे.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी १४६८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीमधील १० टक्के निधी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार एप्रिल ते जून २०२२ या महिन्यांसाठी आमदारांचा २०२२-२३ या आर्थिक वर्षातील कार्यकाळ विचारात घेऊन यापूर्वीच निधी वितरीत करण्यात आला. आता जुलै आणि ऑगस्ट या २ महिन्यांसाठी २७६ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक आमदाराला ८० लाख रुपयांचा निधी मिळणार आहे.

आपापल्या मतदारसंघातील छोटी-मोठी कामे करता येण्यासाठी प्रत्येक आमदाराला निधी दिला जातो. या निधीतून मतदारसंघातील पायवाटा, रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, जलवाहिन्या, शाळा, दुरुस्तीची कामे अशी छोटी-मोठी कामे केली जातात. आमदारांनी सुचविलेल्या कामांना जिल्हा नियोजन विभागाकडून मंजुरी दिली जाते आणि कामे प्रत्यक्ष अंमलात आणली जातात.

मार्चमध्ये आमदारांच्या विकास निधीत वाढ
राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी आमदार निधी मिळतो. हा विकास निधी ५ कोटी रुपये करण्याची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी याबाबतची घोषणा केली होती. तिस-या वर्षी आमदार निधीत १ कोटी रुपयांची वाढ करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या