18.5 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeमहाराष्ट्रराजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना आमदारकीचे तिकीट

राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना आमदारकीचे तिकीट

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवार निवडीसाठी खलबते सुरू आहे. येत्या दोन दिवसांत नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील विधान परिषदेच्या १२ जांगासाठी दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांचेही नाव चर्चेत आहे. तसेच, राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घोषित केली आहे. या सहा जागांमध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.

काँग्रेसचे खासदार दिवंगत राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राजीव सातव यांच्या जागेवर काँग्रेस पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील दोन दिवसांमध्ये उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून मुकूल वासनिक, रजनी पाटील, प्रज्ञा सातव, मिलिंद देवरा, राजीव शुक्ला यांच्या नावाची चर्चा आहे.

रजनी पाटील यांना राज्यसभा तर सातव यांना विधान परिषद?
मात्र राज्यसभेसाठी रजनी पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचे नाव आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव यांना विधान परिषद देऊन रजनी पाटील यांना राज्यसभा देण्याचा काँग्रेसचा एक प्रस्ताव पुढे आला आहे. मुकुल वासनिक यांच्या नावाला विदर्भातील काही काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या