22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा

पुण्यात मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा मनसेचा दावा

एकमत ऑनलाईन

पुणे : ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा सध्या देशभरात चांगलाच पेटला आहे. या प्रकरणावर सध्या सुनावणी सुरू आहे. मंदिराच्या जागी ही मशीद उभारल्याचा दावा करण्यात आला आहे. आता पुण्यातही अशाच प्रकारे मंदिराच्या जागी मशीद उभी करण्यात आल्याचा दावा करण्यात आता आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा मनसेने केला आहे.

ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच पुण्यातल्या या मंदिरांच्या जागी छोटा शेख, बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले असल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी केला आहे. या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभारण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केले आहे.

काल पुण्यात मनसेची सभा झाली. या सभेत बोलताना अजय शिंदे म्हणाले, पुण्येश्वरालाही मोठा इतिहास आहे. अल्लाउद्दीन खिल्जीचा बडा अरब हा सरदार पुण्यावर चाल करून आला, त्यावेळी त्यानं भगवान शंकराचं मंदिर उध्वस्त केलं. फक्त एकच नाही तर पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही दोन्ही मंदिरं उध्वस्त केली.

एक मंदिर शनिवारवाड्याच्या बरोबर समोर आहे तर दुसरे लालमहालाच्या थोडं पुढे आहे. आज तिथं छोटा शेख दर्गा आहे. सगळ्या मंदिरांच्या वर या मशिदी उभारण्यात आल्या आहेत.अजय शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर आता मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका लावून धरली आहे. कालच्या सभेत मनसेने मशिदींवरचे भोंगे हटवण्याविषयीचं आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या