22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे ऍक्शन मोडमध्ये

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मनसे ऍक्शन मोडमध्ये

एकमत ऑनलाईन

बारामती : महाराष्ट्र नवनिर्माण सेना फक्त मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत अस्तित्वात आहे, अशी टीका नेहमी केली जाते. परंतु, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुका मनसे लढवेल अशी घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच मनसे जर गाव पातळीवरच्या निवडणुकीत ताकदीनिशी उतरली तर याचा फटका नेमका महाविकास आघाडीला बसणार की भाजपला हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरे यांच्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळे सर्व मनसे नेते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष हे वेगाने तयारीला लागले आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. सध्या रिव्हर्स मोडवर असलेले मनसे इंजिन ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नशीब आजमावत पुन्हा एकदा रुळावर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. म्हणून मनसेने आपला मोर्चा गाव पातळीवर वळविला आहे.

पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पक्षप्रमुख ठाकरे यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (दि. १८) बारामतीमध्ये चार तालुक्यांतील प्रमुख पदाधिका-यांची बैठक पार पडली. मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांनी यावेळी पदाधिका-यांबरोबर संवाद साधला. मनसे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. सुधीर पाटसकर यावेळी उपस्थित होते.

भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईकच्या तयारीत – पाकचे परराष्ट्र मंत्री कुरेशी यांचा आरोप

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या