27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रमनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींविरुद्ध गुन्हा दाखल

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरींविरुद्ध गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबई पोलिस कॉन्स्टेबलला धक्का देऊन पळ काढल्याचा आरोप लावत मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेकडून ठिकठिकाणी मनसैनिकांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवण्याचा प्रयत्न काल (४ मे) करण्यात आला होता.

पण, मुंबईत मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिस ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे कारमधून घटनास्थळाहून निसटले. त्यावेळी या झटापटीदरम्यान एक महिला कॉन्स्टेबल खाली पडल्या. त्यामुळे या प्रकरणात संदीप देशपांडे, संतोष धुरी आणि संदीप यांचा वाहनचालक यांच्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

देशपांडे यांनी एक व्हीडीओ जारी करून आपली बाजू स्पष्ट केली
आपण राज ठाकरे यांना भेटायला गेलो असता पोलिसांनी मला बाजूला नेले, पण ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी सांगितले नाही. त्यावेळी आम्ही गाडीत बसत असताना पोलिसांनी मला खेचण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या ड्रायव्हरने गाडी पुढे नेली. पण आमच्या गाडीच्या पंधरा फूट मागे त्या महिला पोलिस अधिकारी पडल्या होत्या. त्याचा आमच्याशी काहीएक संबंध नाही, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या