29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबईसाठी मनसेची जोरदार मोर्चेबांधणी

मुंबईसाठी मनसेची जोरदार मोर्चेबांधणी

एकमत ऑनलाईन

मुंबई: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आतापासूनच कंबर कसली आहे. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत सध्या पक्षाच्या बैठका पार पडत आहेत. यामध्ये मनसेने महानगरपालिकेच्या निवडणुका स्वत:च्याच बळावर लढवाव्यात असा सूर व्यक्त होताना दिसत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. आम्ही महापालिकेच्या बैठकांना सुरुवात केली आहे. आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये आम्ही विभागनिहाय परिस्थितीचा आढावा घेत आहोत. अमित ठाकरे स्वत: सगळ्या बैठकांना हजर असतात. ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

या बैठकांमध्ये मनसेने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, असा सूर उमटताना दिसत आहे. पालिकेच्या सर्वच्या सर्व २२७ जागांवर स्वतंत्रपणे लढावे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आम्ही कार्यकर्त्यांची ही भावना राजसाहेबांपर्यंत पोहोचवू. पण अंतिम निर्णय तेच घेतील, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

अमित ठाकरेंचा प्रभाव वाढणार: संदीप देशपांडे
अमित ठाकरे यांच्यावर सध्या लोकसभेच्या एका जागेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कार्यकर्ते आणि तरुणांमध्ये त्यांची इतकी क्रेझ आहे की, ते एका मतदारसंघापुरते मर्यादित राहणार नाहीत. आगामी काळात अमित ठाकरे यांचा प्रभाव सर्वच महानगरपालिकांमध्ये दिसून येईल, असा दावाही संदीप देशपांडे यांनी केला.

अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात बैठकीदरम्यान मोठा वाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या