23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रमनसेने शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा होता - खा.संजय राऊत

मनसेने शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा होता – खा.संजय राऊत

एकमत ऑनलाईन

मुंबई : मी किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध जी शिवराळ भाषा वापरली त्याचे राज ठाकरे यांनी कौतूक करायला पाहिजे होते. राज ठाकरे हे कालपर्यंत स्वत:ला मराठी अभिमानी म्हणून मिरवत होते. आम्हीच मराठीचे एकमेव तारणहार आहोत, अशी भूमिका घेऊन ते राजकारणात आले होते. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्याबाबत मी वापरलेल्या शिवराळ भाषेचे काल राज ठाकरे यांनी अभिनंदन केले असते किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचे खरे मराठीप्रेम काल दिसले असते, अशी टिप्पणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली, ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज ठाकरे यांनी कालच्या सभेत माझ्या शिवराळ भाषेचा मुद्दा उपस्थित केला. पण महाराष्ट्रद्वेष्ट्या किरीट सोमय्या याच्याविरुद्ध मी वापरलेल्या शिवराळ भाषेचा मला गर्व आणि अभिमान आहे. मी किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध शिवराळ भाषा का वापरली,याचा राज ठाकरे यांनी अभ्यास केला पाहिजे होता. जेणेकरून त्यांना माझी वेदना समजून घेता आली असती. हाच किरीट सोमय्या महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची असू नये, म्हणून न्यायालयात गेला होता. सोमय्या आणि त्यांच्या पंटर्सनी मिळून मुंबईला महाराष्ट्रपासून तोडण्याचे प्रेंझेटेशन तयार केले आहे. त्यासाठी हे सर्वजण दिल्लीत लॉबिंग करत आहेत. ही गोष्ट समजल्यामुळे संतापाच्या भरात माझ्या तोंडातून शिवी बाहेर पडली. यासाठी मराठी जनता मला माफ करेल आणि उत्तेजनही देईल, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली.

सोमय्यांना शिवतीर्थवर बोलवावे
राज ठाकरे यांनी किरीट सोमय्या यांच्या मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या भूमिकेचे समर्थन करायचे असेल तर त्यांनी ते जरूर करावे. राज ठाकरे यांची भूमिका बदलली असेल तर त्यांनी किरीट सोमय्या यांना शिवतीर्थवर बोलवून शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार कराव.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या